हातचलाखीने ज्वेलर्समधून अंगठया चोरणाऱ्या महिलेला अटक

पुणे शहरातील विश्रांतवाडीतील पार्श्वनाथ ज्वेलर्समधून हातचलाखीने सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली आहे. तिच्याकडून 88 हजारांच्या अंगठ्या आणि दुचाकी असा 1 लाख 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अपर्णा अजित ससाणे (रा. चंदननगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

गुन्हे शाखेकडून पार्श्वनाथ ज्वेलर्सच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक महिला हात चलाखीने दोन अंगठया चोरीत असल्याचे दिसून आले. संबंधित चोरटी महिला चंदननगर परिसरात राहण्यास असल्याची माहिती पोलीस अंमलदार राकेश खुणवे आणि अशोक शेलार यांना मिळाली. विश्रांतवाडी बसस्थानक परिसरात वाट पाहत असताना पथकाने अपर्णा ससाणे हिला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, एपीआय शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार राकेश खुणवे , अशोक शेलार, प्रविण भालचिम, दत्ता फुलसुंदर, विशाल शिर्के यांनी यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या