
सामना प्रतिनिधी । मनमाड
येथील कॅम्प विभागातील श्रावस्ती नगरमधील महिलांनी नळाने पाणी मिळावे यासाठी पालिकेवर मंगळवारी निदर्शने व घोषणाबाजी करत हंडा मोर्चा काढून पालिका अधिकार्यांना निवेदन दिले. जोपर्यंत नळाने पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन अधिकार्यांनी मोर्चेकरी महिलांना दिले. दलित वस्तीसाठी नवीन पाण्याची पाईप लाईन व्हावी यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, टेंडरही पास झाले आहे त्यातून येथे तातडीने नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊ शकते, पण त्याला प्राधान्य देण्यात ऐवजी रस्त्याच्या कामाला प्राधान्य दिले जाते ही बाब चुकीची आहे, असे या महिलांचे म्हणणे आहे.
आधीच शहरात 20 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे या भागातील सर्व बोअरिंग आटल्या आहेत या भागात 20 वर्षांपासून पाईप लाईन नसल्याने नगरपालिका नळाद्वारे पाणी पुरवठा करू शकत नाही महिलांना लांब अंतरापर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागते त्यामुळे संतप्त महिलांनी येथील नगरसेविका अर्चना जाधव यांच्या नेतृत्ववाखाली हा हंडा मोर्चा पालिकेवर काढला
पण तेथे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी दोघेही नव्हते अखेर पालिका अधिकार्यांना निवेदन देण्यात आले तेंव्हा टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन उपस्थित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी दिले.
























































