एकनाथ शिंदेच्या प्रचार सभेला गर्दी जमविण्यासाठी महिला बचत गटांना सक्ती; चहा,नाष्टा आणि जेवणाचे आमिषाबरोबरच वाहतूकीसाठी बस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी उद्या दि.३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत येत आहेत.साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलावाजवळील मैदानात एकनाथ शिंदे यांची जाहिर सभा होणार आहे.यासभेला गर्दी करण्यासाठी महिला बचत गटांतील पाच सदस्यांना येण्याचे बंधन घातले गेले आहे.तसा संदेश व्हॉटसॲपवरून पाठवण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी महिला बचत गटांना वेठीस धरले आहे.बचत गटांना व्हॉटसॲप संदेश पाठवण्यात आला आहे.त्यासंदेशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भेटीसाठी येणार आहेत.लाडकी बहीण व व्यवसायाबाबत माहिती देणार आहे.बसचे नियोजन करण्यात आले आहे. असे मॅसेज पाठवण्यात आले आहेत.तसेच नाष्टा आणि जेवण देणार असल्याचेही सांगितले आहे.

आचारसंहिता भंग नाही का?

जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात सभेसाठी महिला बचत गटांच्या सदस्यांना बोलावून लाडकी बग आणि व्यवसायाबाबत माहिती देणे हा आचारसंहितेचा भंग होत नाही का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.चहा,नाष्टा,जेवण आणि बसची व्यवस्था करण्यात आली आहे असे संदेशात म्हटले आहे.मग निवडणूक आयोग हे सर्व  खर्चात पकडणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.