
आहारातून पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास आपण ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया आणि कॅल्शियमची कमतरता (पोपॅलेसीमिया) आजार होण्याची शक्यता वाढवतात. कॅल्शियममुळे स्नायूंमधील शिथिलता तसेच रक्तसंचय योग्यरीतीने होण्यास मदत होते. म्हणूनच आवश्यक प्रमाणात कॅल्शियम सेवन करायलाच हवे. सामान्य व्यक्तींसाठी दररोज 1 हजार ते दीड हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.
वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या हाडांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते. वयोमानापरत्वे हाडांची झीज ही मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या आहारात अतिरिक्त कॅल्शियम ठेवणे हे कॅल्शियमच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय आहे.
महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता ही फार मोठ्या प्रमाणात असते. खासकरून चाळीशीच्या जवळपास पोहोचताना हाडांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आहारामध्ये योग्य त्या पद्धतीने कॅल्शियमचा समावेश असणे गरजेचे आहे.
चेहऱ्याचे सौंदर्य खिलवण्यासाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा
कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ
सोयाबीनपासून तयार झालेल्या टोफूमध्येही कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे टोफूचा आहारात आठवड्यातून एकदा तरी समावेश करावा. कॅल्शियम वाढीसाठी सोया दूध हाही एक उत्तम पर्याय आहे.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
गुळ चणे हा कॅल्शियमचा एक भन्नाट पर्याय आहे. रोज एक गुळाचा खडा आणि थोडे चणे खाल्ल्यास आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते.
दूध, चीज आणि दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणूनच दिवसातून एकदा तरी या पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
रोज सकाळी बदाम खाणे किंवा बदाम दूध पिणे हा एक उत्तम कॅल्शियमचा स्त्रोत मानला जातो.