गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या

891
प्रातिनिधिक फोटो

औसा येथील 20 वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. 25 आॕगस्ट रोजी घडली आहे.

कांचन बालाजी मलवाड (वय 20 वर्ष) या महिलेने गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन रणदिवे यांच्या फिर्यादीवरुन औसा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून शनिवारी सायंकाळी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.  महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक नृसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शखाली या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या