बेस्ट पतपेढी निवडणुकीत वर्कर्स युनियन विजयी

बेस्ट कामगारांच्या ’दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटी’च्या पंचवार्षिक निवडणुकीत शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट वर्कर्स युनियन विजयी झाली. या युनियनचे 21 पैकी 14 उमेदवार निवडून आले, तर सहकार समृद्धी पॅनेलने 7 जागांवर विजय मिळवला.

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना प्रणित ’उत्कर्ष’ पॅनेल, शशांक राव आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांचे सहकार समृद्धी पॅनल रिंगणात उतरली होती. त्यामुळे अटीतटीची लढत झाली.

भाजपकडून पैशांचे वाटप, सत्तेचा गैरवापर

भाजपकडून या निवडणुकीत पैशांचे वाटप, सत्तेचा गैरवापर करण्यात आला असा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला. आम्ही यापुढेही कर्मचायांच्या हितासाठी आणि बेस्ट वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार, असे सामंत म्हणाले.