World cup 2019 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत न्यूझीलंडने मारली बाजी

सामना ऑनलाईन । बर्मिंघन

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 स्पर्धेत 25 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात बर्मिंघनच्या मैदानावर रंगला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत न्यूझीलंडने बाजी मारली. आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 242 धावांच आव्हान न्यूझीलंडने 3 चेंडू आणि 4 विकेट्स राखून गाठले. कर्णधार केन विलियम्सनची नाबाद 103 धावांची खेळी आणि मोक्याच्या वेळी ग्रँडहोमने ठोकलेले अर्धशतक न्यूझीलंडला विजयी करून गेले. या विजयासह वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड टॉप वर पोहचली आहे, तर आफ्रिकेसमोर विश्वचषकातून बाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वाचा लाईव्ह अपडेट –

 • न्यूझीलंडला अर्धा संघ तंबूत
 • 132 चेंडूत विजयासाठी 137 धावांची आवश्यकता
 • 25 षटकानंतर न्यूझीलंडच्या 4 बाद 103 धावा

पिछे देखो पिछे… न्यूझीलंडचा गुप्टिल झाला विचित्र पद्धतीने बाद

 • न्यूझीलंडला चौथा धक्का
 • न्यूझीलंडला तिसरा धक्का

 • 15 षटकानंतर न्यूझीलंडच्या 2 बाद 72 धावा
 • न्यूझीलंडला दुसरा धक्का
 • न्यूझीलंडच्या 50 धावा पूर्ण
 • दहा षटकानंतर न्यूझीलंड 1 बाद 43 धावा
 • न्यूझीलंडला पहिला धक्का
 • आफ्रिकेचे न्यूझीलंडसमोर 241 धावांचे आव्हान

 • आफ्रिकेच्या 150 धावा पूर्ण
 • 35 षटकानंतर आफ्रिकेच्या 4 बाद 145 धावा
 • आफ्रिकेला चौथा धक्का, माक्रम बाद
 • 30 षटकानंतर आफ्रिकेच्या 3 बाद 123 धावा
 • अर्धशतकानंतर आमला बाद
 • आफ्रिकेच्या 100 धावा पूर्ण
 • हाशिम आमलाचे वर्ल्डकपमधील पहिले अर्धशतक

 • 20 षटकानंतर आफ्रिकेच्या 2 बाद 73 धावा
 • आफ्रिकेचा संथ खेळ
 • 15 षटकानंतर आफ्रिकेच्या 2 बाद 60 धावा
 • आफ्रिकेला दुसरा धक्का, डू प्लसिस बाद
 • आफ्रिकेच्या 50 धावा पूर्ण
 • हाशिम आमलाच्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण

 • 10 षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 40 धावा
 • पाच षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 18 धावा
 • आफ्रिकेची खराब सुरुवात, डि कॉक 5 धावांवर बाद

 • पहिल्या षटकानंतर बिनबाद 5 धावा
 • आफ्रिकेचे सलामीवीर डि कॉक आणि आमला मैदानात
 • न्यूझीलंडचा संघ : मार्टिन गुप्टिल, कोनिल मुनरो, केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लाथम, जिम्मी निशाम, कोलिन डी ग्रॅन्डहोम, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्यूसन, मिशेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट
 • दक्षिण आफ्रिकेचा संघ : हाशिम अमला, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडिन मार्क्रम, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रासी वैन डेर डुसैन, डेव्हिड मिलर, आंदिले फेहुक्वायो, क्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, लुंगी निगिडी, इमरान ताहिर
 • नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
 • पावसामुळे वेळ वाया गेल्याने सामना 49 षटकांचा करण्याचा निर्णय

 • पावसामुळे मैदान ओले झाल्याने नाणेफेकीला उशिर
 • दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सामना