
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरात डाऊन झाले आहे. तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास डाऊन झाले आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. नेटकरी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत तक्रार करत आहेत.
दरम्यान, फेसबुक संकेतस्थळावर एक संदेश दिसत आहे. ज्यात लिहिलं आहे की, “क्षमस्व, काहीतरी चूक झाली आहे, आम्ही त्यावर काम करत असून ही समस्या लवकरात लवकर दुरुस्त करू.”
WhatsApp suffered outage, users are not able to send and receive new messages for nearly 10 minutes.
— ANI (@ANI) October 4, 2021


























































