
जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आता तब्बल 116 वर्षांची झाली आहे. एथेल कॅटरहॅम असे या महिलेचे नाव असून तिने 21 ऑगस्ट रोजी वयाची 116 वर्षे पूर्ण केली आहेत. एथेलच्या वाढदिवसानिमित्त तिचे सर्व कुटुंब उपस्थित होते. गेल्या वर्षी राजा चार्ल्स (तिसरे) यांनी एथेल कॅटरहॅम यांना त्यांच्या 115 व्या वाढदिवसानिमित्त एक कार्ड पाठवले होते. एथेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909 रोजी शिप्टन बेलिंगर, हॅम्पशायर येथे झाला. राजा एडवर्ड सातवे आणि हर्बर्ट एस्क्विथ यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्या वाढल्या.