ना सीट, ना चाकं…जगातील सर्वात कमी उंचीची कार

जगातील सर्वात कमी उंचीची कार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ना सीट, ना चाकं… अगदी जमिनीवर सरपटत चालेल अशी गाडी. होंडा सिविकची ही कस्टमाईज कार एका ऑटो प्रदर्शनासाठी तैवान येथे विकसित करण्यात आली. या मॉडिफाईड कारमध्ये कोणतीही सीट नाही. ही कार जमिनीपासून केवळ काही मिलीमीटर उंच आहे. चालकाला गाडीच्या आता झोपावे लागते. लैंन डाँग यांच्या नेतृत्वाखाली स्टान्स गॅरेज तैवानच्या टीमने कार तयार केलीय.