
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डी’ आणि ‘ई’ या दोन इमारतींना ताबा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असून 556 रहिवाशांचा लवकरच नव्या अलिशान घरात गृहप्रवेश होणार आहे. रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्यासाठी म्हाडाने मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून त्यांची वेळ मिळताच चावी वाटपाचा कार्यक्रम होईल.
म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. वरळीतील 121 चाळींचा पुनर्विकास करून 9689 सदनिका उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील आठ विंगपैकी दोन इमारतींना ओसी मिळाली आहे.
z डिसेंबरपर्यंत वरळी बीडीडी चाळीतील 1690, नायगाव बीडीडी चाळीतील 1400 आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील 342 रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.