दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशी शिक्षा दिली असती का? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल

पुण्यातील कल्याणीनगर पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका चालकाने दंड भरल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून आपले पाय चेपून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशी शिक्षा दिली असती का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशी शिक्षा दिली असती का? पुण्यातील हे वृत समोर आले आहे की दंड भरून पण ड्राइव्हर कडून पोलिसांनी पाय दाबून घेतले, सेवा करून घेतली. पुणे पोलिस कायद्याच्यावर झाले का? एखाद्याने नियम मोडला तर दंड आकारा, पण स्वतःचे पाय दाबून घेणे हा कसला माज आहे? हे कोण पोलिस आहेत , ह्या व्हिडिओची तपासणी करून पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.श्रीमंतांना एक न्याय, सामान्य नागरिकांना दुसरा न्याय आहे का? असा सवाल त्यांनी एक्सवर केला आहे.