
सामना प्रतिनिधी । पुणे
आयपीएस अधिकारी उदय शुक्ला (५८) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पुणे शहराच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
उदय शुक्ला हे मुंबईत पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य सुरक्षा आयुक्त होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. गेल्या आठवडय़ात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले.





























































