WTC Final Live न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय, टीम इंडियाचा पराभव

इंग्लंडच्या साउथहॅम्प्टन येथे सुरू असलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने आठ गडी राखत टीम इंडियाचा पराभव केला आहे. हा विजय मिळवत न्यूझीलंडने पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडपुढे विजयासाठी 139 धावांचे आव्हान ठेवले आहे. चहापानापर्यंत न्यूझीलंडने बिनबाद 19 अशी सुरुवात केली. त्यानंतर आर. अश्विन याने दोन्ही सलामीविरांना बाद करत सामना रंगतदार केला. न्यूझीलंडचा सलामीवीर कॉन्व्हे याला बाद करत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 71  बळींची नोंद केली आहे.

तत्पूर्वी लंचपर्यंत हिंदुस्थानने 5 बाद 130 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर टीम इंडियाचे पुढील पाच खेळाडू अवघ्या 40 धावांमध्ये माघारी परतले. टीम इंडियाचा संपूर्ण संघ 170 धावांमध्ये बाद झाला. रिषभ पंत याने सर्वाधिक 41 धावा केल्या.

दरम्यान, टीम इंडियाने आपला दुसरा डाव कालच्या 2 बाद 64 धावांवरून पुढे सुरू केला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या कालच्या नाबाद जोडीला टीम इंडियाने सुरुवातीच्या काही षटकांमध्ये गमावले. कोहलीने 13 तर पुजाराने 15 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणेही 15 धावा काढून बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाचा डाव संकटात सापडला.

पंत-अश्विनचा बेजबाबदार खेळ

दरम्यान, पंतसोबत जोडी जमलेली आहे असे वाटत असताना जडेजा खराब फटका मारून बाद झाला. जडेजा बाद झाल्यानंतर रिषभ पंतने जबाबदारीने खेळ करणे आवश्यक होते. मात्र पंतने बोल्टच्या गोलंदाजीवर बेजबाबदार खेळ करत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि हेन्री निकोल्सकरवी तो झेलबाद झाला. यानंतर अश्विननेही बाहेर जाणारा चेंडू सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि रॉस टेलरने स्लिपमध्ये त्याला टिपला.

WTC Final ला गालबोट, न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरवर वर्णद्वेषी टिप्पणी

न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज टीम साउथीने सर्वाधिक 4 बळी घेतले, ट्रेन्ट बोल्टने 3, कायले जेमिसनने 2 आणि निल वॅगनर याने एक बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.


जेमिसनने दुसऱ्यांदा विराटला टिपले

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन याने दोन्ही लढतीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचा टिपले. पहिल्या डावात त्याने कोहलीला पायचित, तर दुसऱ्या डावात यष्टीमागे वॉल्टिंगकरवी झेलबाद केले. कोहलीने पहिल्या डावात 44 तर दुसऱ्या डावात 13 धावा केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या