तू खिच मेरी फोटो! 108 MP कॅमेरावाला दमदार स्मार्टफोन लॉन्च, वाचा सविस्तर…

2681

फोटो काढायची आणि काढून घेण्याची आवड असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी झाओमीने (Xiaomi) नवीन Mi CC9 Pro स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मंगळवारी चीनमध्ये झालेल्या एका रंगारंग कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे सर्वात खास आणि दिलखेचक वैशिष्ट्य म्हणजे 108 मेगापिक्सला कॅमेरा.

Mi CC9 Pro स्मार्टफोनला पाच कॅमेरे देण्यात आले आहेत. स्मार्टफोनला चार रिअर कॅमेरे आणि एक सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि 10 एक्स हायब्रिड झुम देण्यात आले आहे. डेप्थ इफेक्टसाठी यात 12 मेगापिक्सलची लेन्स देम्यात आली आहे आणि 20 मेगापिक्सलची एक अल्ट्रावाईड लेन्सही देण्यात आली आहे. मॅक्रोसाठी 2 मेगापिक्सलचा डेडिकेटेड सेन्सरही देण्यात आले आहे.

mi-cc9-pro-4

सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. या खास वैशिष्ट्यामुळे बाजारमध्ये याला तुफान मागणी येईल अशी आशा कंपनीला आहे. 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यावाला हा स्मार्टफोन तीन व्हेरिएन्टसमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

mi-cc9-pro-2

स्मार्टफोनच्या बेस मॉडेलला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर दुसऱ्या व्हेरिएन्टसमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि तिसऱ्या व्हेरिएन्टसमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याची सुरुवातीची किंमत 2799 युआन (जवळपास 28 हजार रुपये) असून टॉप मॉडेलची किंमत 3100 युआन (जवळपास 35 हजार रुपये) आहे.

वाचा स्मार्टफोनचे वैशिष्ट्य –

– चार रिअर कॅमेरे आणि एक सेल्फी कॅमेरा
– प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा
– स्मार्टफोन तीन व्हेरिएन्टसमध्ये लॉन्च
– 6 जीबी आणि 8 जीबी रॅमच्या व्हेरिएन्टसचा पर्याय
– 6.47 इंचाची फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले
– Qualcomm Snapdragon 730G प्रोसेसर

दरम्यान, हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हिंदुस्थानमध्ये हा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु 6 नोव्हेंबरला कंपनी ‘Mi Note 10’ या नावाने हा फोन जगभरात लॉन्च केला जावू शकतो.

mi-cc9-pro

आपली प्रतिक्रिया द्या