भारतीय महिलांची बदनामी करणाऱ्या ग्लीडेन ॲपवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार – ॲड.यशोमती ठाकूर

एका सर्व्हेच्या माध्यमातून हिंदुस्थानी महिलांची बदनामी करणाऱ्या ग्लीडेन या फ्रेंच ॲपवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

ग्लीडेन या ॲपवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करू. याप्रकरणी आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या