यवतमाळ जिल्हय़ातील युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिल्हय़ातील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

जिल्हा युवती अधिकारी – निमिषा पोपट, यवतमाळ, दारव्हा-दिग्रस विधानसभा, मीनल गौरकार- वणी-आर्णी विधानसभा, जिल्हा समन्वयक – वृषाली पुरी, यवतमाळ, दारव्हा-दिग्रस, उपजिल्हा युवती अधिकारी- स्वाती कोकाटे, यवतमाळ विधानसभा; भाग्यश्री शिंदे, दारव्हा-दिग्रस विधानसभा; पायल कनाके- आर्णी विधानसभा, तालुका युवती अधिकारी- सेजल गिरी, यवतमाळ तालुका; अभिषा गौरकार- वणी तालुका; मंजुषा वानखेडे- महागांव तालुका, तालुका चिटणीस- शिल्पा थेटे, यवतमाळ तालुका, उपतालुका युवती अधिकारी- हर्षदा चिखलकर, यवतमाळ तालुका; सोनू पवार- महागांव तालुका, शहर युवती अधिकारी – ईश्वरी उडाखे, यवतमाळ शहर; गायत्री राठोड – महागांव शहर, शहर समन्वयक – वैष्णवी चिखलकर, यवतमाळ शहर, उपशहर युवती अधिकारी – आचल बारड, यवतमाळ शहर; जान्हवी दावड- यवतमाळ शहर; कल्याणी पवार- महागांव शहर; जयश्री जाधव- महागांव शहर; राजनंदिनी डोंगरदिवे- महागांव शहर