योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा? फोटो केले डिलीट आणि…

टिव्ही मालिकेतील प्रसिद्ध जोडपं योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या लग्नाला वर्ष झाले नाही आणि त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. योगिताने लग्नाचे फोटोही डिलीट केले.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण हिने 2024 मध्ये तिचा सहकलाकार सौरभ चौघुलेशी लग्न केले. दोघंही एकमेकांसोबत आनंदी होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत आहेत. शिवाय योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो डिलिट केले असून सौरभला अनफॉलो केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे., गेल्या काही महिन्यांपासून योगिताने सौरभसोबतचे फोटो, रिल्स शेअर केलेले नाहीत. शिवाय दिवाळीतलेही फोटो शेअर केलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र योगिता आणि सैौरभने अधिकृतरित्या काहीच वक्तव्य केलेले नाहीत.