बीड जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील खर्डेवाडी येथील 35 वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने दुष्काळाला आणि गरिबीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. महादेव रामभाऊ भोसले असं या तरुणाचं नाव आहे.

महादेव गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करत होता. अल्प भूधारक शेतकरी असल्याने शेतीवर कुटुंबाचे भागत नव्हते. त्यात दुष्काळाने उत्पन्न घटले, मोठी ओढाताण होऊ लागली. मिळेल ते काम करण्याची इच्छा, छोटा मोठा उद्योग करण्याची ही धडपड यासाठीच नेहमी मुद्रा कर्ज मिळते का म्हणून प्रयत्नही करत होता. मात्र त्याला यश मिळत नव्हते. या वर्षी कांद्याने निराशा केली होती. या सगळ्याने नैराश्य आलेल्या महादेव याने महाशिवरात्रीच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले असून त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.