
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तुमच्या घरातील, खासगी वापरातील कम्प्युटर वापरताना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कम्प्युटरचा वापर हवातसा करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण आता कम्प्युटरमधील माहितीवर केंद्र सरकारची गुप्त नजर असणार आहे. तसेच केंद्र सरकारने देशातील दहा बड्या एजन्सींना कम्प्युटरवर वॉच ठेवण्याची परवानगी दिली आहे. या एजन्सींद्वारे तुमच्या कम्प्युटरमधील डेटा कधीही आणि केव्हाही तपासला जाऊ शकतो.
MHA: Competent authority hereby authorizes the following security and intelligence agencies (in attached statement) for purposes of interception, monitoring and decryption of any information generated, transmitted, received or stored in any computer resource under the said act pic.twitter.com/3oH9e7vv6T
— ANI (@ANI) December 21, 2018
केंद्र सरकारने एक नवा आदेश जारी केला असून त्याद्वारे एजन्सीची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार कम्प्युटरमध्ये किती डेटा आहे. कोणत्या प्रकारचा डेटा आहे. कम्प्युटरवर तुम्ही काय पाहाता आणि काय सेव्ह करून ठेवता या सर्वांवर या एजन्सी लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे तुमच्या कम्प्युटरमधील माहिती आता खासगी असली तरी त्यावर सरकार लक्ष ठेऊ शकणार आहे.
या एजन्सी ठेवणार कम्प्युटरवर गुप्त नजर
सीबीआय
आयबी
एनआयए
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
सक्तवसुली संचालनालय
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स
डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स
रॉ
दिल्ली पोलीस आयुक्त
डायरेक्टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजन्स (जम्मू-कश्मीर, उत्तर-पूर्व आणि आसामसाठी)




























































