
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. सोशल मीडियावर रिल व्हिडीओ पाहून वेगवेगळी ठिकाणे एक्सप्लोर करतात. ही ठिकाणे फिरताना अनेकांना चांगले वाईट अनुभव येतात. असाच एक वाईट अनुभव एका तरूणीला केरळ फिरताना आला. यासंदर्भातील एक व्हिडीओ तरूणीने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओतून तरूणीने पर्यटकांच्या सुरक्षेबाबत आणि त्यांच्या प्रवासी हक्काबाबत भाष्य केलंय.
जान्हवी कोची असे त्या तरूणीचे नाव असून तिने तिच्या केरळच्या सुट्ट्यांचा अनुभव शेअर केला. केरळमधील कोची आणि अलेप्पीमधील प्रवास खूप छान झाला. तेथील लोकही खूप छान होते. त्यांनी अगदी केरळच्या पद्धतीने आमच स्वागत केलं. मात्र मुन्नारला पोहोचल्यावर या आनंदी वातावरणात एक मिठाचा खडा पडला आणि सगळचं एका क्षणात बदललं. आमच्या एअरबीएनबी होस्टने आम्हाला सांगितले की मुन्नारमध्ये उबर आणि ओला पिकअपला परवानगी नाही, हा तेथील लोकल युनियनचा निर्णय आहे. हे एकून सगळन्यांचा धक्का बसला, असे तिने सांगितले.
View this post on Instagram
जान्हवी आणि त्याच्या मैत्रीनींनी त्यांच्या मुन्नारच्या प्रवासासाठी आधीच उबरची बुकिंग केली होती. त्यामुळे जेव्हा त्यांनी एअरबीएनबी होस्टला यांदर्भात उलट सवाल केला, तेव्हा त्यांनी तुम्हाला उबर ड्रायव्हरला एका वेगळ्याच लोकेशनवर भेटावे लागेल असे सांगितले. आम्ही आमच्या ड्रायव्हरला भेटलो आणि आमचे सामान कारमध्ये ठेवणार तितक्यात पाच सहा जण आमच्याकडे आले. आणि त्यांनी आमच्या ड्रायव्हरला धमकावण्यास सुरूवात केली. तुम्ही यांना घेऊन जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
ड्रायव्हर आणि त्या लोकांमधील वाद वाढत चालला होता. त्यामुळे जान्हवीने केरळा पोलिसांना संपर्क केला. यावेळी पोलीस तेथे आले आणि त्यांनी फक्त युनियनच्या लोकांशीच संपर्क साधला. याऊलट पोलिसांनी आम्हालाच युनियनच्या टॅक्सीतून प्रवास करण्यास सांगितले. ‘तुम्हाला त्यांच्यासोबत जावे लागेल किंवा इथेच राहावे लागेल, असे पोलिसांनी सांगितले. जेव्हा आम्ही केरळ टुरिझमशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी देखील युनियन टॅक्सीने प्रवास करावा लागेल असे सांगितले.
जान्हवीला आलेला हा अनुभव अत्यंत भयंकर होता, असे ती म्हणाली. “एक महिला म्हणून, मला उबरमध्ये अधिक सुरक्षित वाटते कारण मी माझे लाईव्ह लोकेशन शेअर करू शकते आणि तक्रारी सहजपणे नोंदवू शकते. पण मला तो पर्याय देण्यात आला नव्हता, अशी खंत यावेळी जान्हवीने व्यक्त केली.






























































