वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईतांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयते हातात घेत दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईतांना समर्थ पोलिसांनी अटक केली. टोळक्याने समर्थ आणि चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड केली होती. शुभ शिवाजी खंडागळे (वय 21), विनायक गणेश कापडे (वय 20), यश दत्ता हेळेकर, साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय 23, सर्व रा. एस.आर.ए.कॉलनी विमाननगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वाहनांची तोडफोड करून टोळक्याने मोटारीतून पळ काढला होता. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रीक विश्लेषणाचे मदतीने संबंधित वाहनाचा नंबर मिळवला. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कामगिरी उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, एसीपी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, एपीआय संदीप जोरे, सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, हेमंत पेर सुभाष मोरे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, निलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, शुभम देसाई,यांनी केली.