कराडमध्ये युवकाच्या डोक्यात दगड घालून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराडमध्ये बुधवार पेठेतील एका युवकाचा गोवारे-चौंडेश्‍वरीनगर येथे डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. किरण लादे (वय 27, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. किरण लादे हा नगरपालिकेतील घंटागाडीवर नोकरीला होता. त्याने शुक्रवारी 12 हजार रुपयांचा पगार घेतला होता. त्यामुळे त्याच्या खुनाचे गुढ वाढले आहे. या खूनामागच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचेही गोडसे यांनी सांगितले.