लग्नाचे अमिष दाखवून आतेभावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव 

आतेभावाने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून धुण्याभांड्यांचे काम करणाऱ्या सहावी शिकलेल्या अल्पवयीन मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या तिच्या आतोभावाविरोधात पोलिसांनी बलात्काराचा आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या मुलीला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

या प्रकरणी पीडित मुलीने आकाश रमेश रणशुर याचेविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आकाशची आई दत्तनगर कोपरगांव येथे 2 ते 3 वर्षापासून राहाते. ती माझ्या वडिलांची सख्खी चुलत बहिण असून ती माझी आत्या लागते. मी सध्या आत्याकडे जायचे, त्यावेळेस आकाश याने माझेशी जवळीक वाढवली व त्याने मला त्याचा फोननंबर दिला. या फोनवर तो नेहमी तुझे आई बाप आंधळे आहेत मी त्यांना सांभाळेल. तू माझ्याशी लग्न कर असे म्हणून आग्रह करु लागला. त्याचे लग्नाच्या प्रस्तावाला मी होकार दिला. त्याने मला गोड बोलून मुर्शतपूर फाटा सोनार वस्ती येथे रहाण्यास नेले. त्याने माझेशी लग्न न करता लग्नाचे आमिष दाखवून माझ्याशी शारीरीक संबंध ठेवून गर्भवती केले. त्यानंतर तिला अंध आई वडिलांकडे बाळंतपणसाठी पाठवून दिले. त्यानंतर 28/12/2018 रोजी आकाशने लग्न केल्याचे समजले. त्यामुळे मी सोनार वस्ती येथे त्याचे घरी गेले असता आकाश व दिपक खरताळे या दोघांनी मला शिवीगाळ करुन मारहाण केली, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने कोपरगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरुन आकाश रमेश रणशुर (रा.सोनारवस्ती, मुर्शतपूर, धारणगाव रोड) व दिपक खरताळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक आशिष शेळके पुढील तपास करीत आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.