यूट्यूबर ज्योती मल्होत्राची याचिका फेटाळली

पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम केल्याच्या आरोपाखाली अटक केलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्राची डिफॉल्ट याचिका हिसारच्या न्यायदंडाधिकारी सुनील कुमार यांनी फेटाळली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने ही याचिका फेटाळली. ज्योती मल्होत्रा हिला 16 मे रोजी पाकिस्तानची मदत केल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी तिच्याविरोधात 2 हजार 500 पानांची चार्जशीट बनवली आहे.