युवा सेनेच्या नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या नियुक्त्या केल्या आहेत.

विलेपार्ले विधानसभेतील उपविभाग युवा अधिकारी (शाखा 82, 84) पदावर जयश परब यांची तर अकोला जिल्हय़ाच्या बाळापूर व अकोट विधानसभा जिल्हा युवा अधिकारीपदी दीपक बोचरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय युवा सेनेच्या विस्तारकपदी अजिंक्य चुंबळे यांची नियुक्ती झाली असून या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांच्या कामाचा आढावा घेऊन नियुक्त्या कायम करण्यात येतील अशी माहिती युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.