आमच्या गाड्या फोडाल तर तुमच्याही गाड्या फोडू, रत्नागिरीतील युवासैनिकांचा कन्नडिगांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद चिपळूण तालुक्यातील उमरोली गावात उमटले. उमरोलीतील युवासैनिकांनी गावात आलेली कर्नाटकची मालवाहतूकीची गाडी अडवून त्यावर जय महाराष्ट्र लिहून ती गाडी कर्नाटकला पाठवली. आज आम्ही गाडी फोडत नाही आहोत पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्यात तर तुमचीही इकडे लोकं आहेत.

तुमच्याही गाड्या महाराष्ट्रात येतात. त्या गाड्या फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा युवासेनेचे उपतालुका युवाधिकारी प्रितम वंजारे यांनी दिला आहे. कर्नाटकातून सिमेंट घेऊन आलेली गाडी अडवून त्या गाडीवर शिवसैनिकांनी भगवा झेंडा फडकावला.

तसेच गाडीच्या काचेवर भगव्या अक्षरात जय महाराष्ट्र लिहून कर्नाटकला एक इशारा दिला आहे. यावेळी उपतालुका युवाधिकारी प्रितम वंजारे, माजी विभाग प्रमुख विक्रम साळुंखे, विभाग अधिकारी शुभम मोरे उपस्थित होते.