कुर्ला विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुर्ला विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील.

कुर्ला विधानसभा विभाग युवा अधिकारीपदी आदित्य गिड्डे यांची तर विधानसभा समन्वयकपदी लहू तुपारे, रोहन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभाग युवा अधिकारीपदी कौशिक साटम (शाखा क्र 169, 149, 151), सागर कोचले ( शाखा क्र 168, 165) यांची तर विधानसभा चिटणीसपदी नीलेश माने, दिनेश पोटे, विजय मांढरे, चेतन आर्जुगुडे यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवा अधिकारीपदी नचिकेत शिलोत्री (शाखा क्र. 149), सचिन तांबे (शाखा क्र. 151), तुषार भाटे (शाखा क्र. 165), उपशाखा युवा अधिकारीपदी निखिल भोसले (शाखा क्र. 165) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवा अधिकारीपदी सिद्धेश शिरगावकर (शाखा क्र. 168), उपशाखा युवा अधिकारीपदी सूरज श्रीवास्तव (शाखा क्र. 168), उपशाखा युवा अधिकारीपदी आनंद नखाते (शाखा क्र. 168) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवा अधिकारीपदी संग्राम ढमाळ (शाखा क्र. 169), आदित्य गायकर (शाखा क्र. 170), दुर्गेश शिंदे (शाखा क्र. 171) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आयटीसेल युवा अधिकारीपदी पराग पाटील यांची तर युवा ब्रिगेड अधिकारीपदी राहुल पोकळे, हर्षल खरात, चेतन शिंदे, संदेश मोरे, सागर मुराद यांच्या नियुक्त्या केल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.