श्रीनगरमध्ये 90 टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही!

62

सामना ऑनलाईन । श्रीनगर

श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील जकळपास 90 टक्के मतदान केंद्रांवर एकाही मतदात्याने मतदान केले नसल्याचे आढळून आले. एकाही मतदाराने मतदान न केलेल्या मतदारसंघात ईदगाह, खनयार, हब्बा कदल आणि बटमालू क्षेत्राचा समावेश असून बहुतांश मतदान केंद्रे श्रीनगरच्या मुख्य भागातील आहेत.

श्रीनगर लोकसभा मतदारसंघात 12,95,304 नोंदणीकृत मतदार आणि 1716 मतदान केंद्रे आहेत. श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सतर्फे फारुख अब्दुल्ला, पीडीपीकडून सय्यद मोहसीन, भाजपकडून खालिद जहांगीर आणि पीपल्स कॉन्फरन्सकडून इरफान अन्सारी हे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. काँग्रेसने मात्र फारुख अब्दुल्ला यांच्यासाठी आपला कोणताही उमेदवार दिलेला नाही.

फारुख अब्दुल्ला यांनी सोनावर विधानसभा मतदार क्षेत्रात मतदान केले. या मतदान क्षेत्रात केवळ 12 टक्के मतदान झाले आहे. ईदगाह विधानसभा क्षेत्रात 3.3 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग असलेल्या गंदेरबल जिल्ह्यातील 27 मतदान केंद्रांवर एकाही मतदाराने मतदानासाठी हजेरी लाकली नाही. बडगाम भागातील चडुरामध्ये पाच विधानसभा क्षेत्रांत सर्वात कमी 9.2 टक्के मतदान झाले तर चरार-ए-शरीफमध्ये सर्वाधिक 31.1 टक्के मतदान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या