
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी, शरीराला डिहायड्रेशन, उष्माघातापासून वाचवण्यासाठी काही पदार्थ खाणे हे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक हंगामी फळे मिळतात. या फळांमुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. तसेच शरीराला थंडावाही मिळतो. उन्हाळा सुरु होताक्षणी बाजारामध्ये आपल्याला बेलफळ दिसू लागते. हे बेलफळ आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम मानले जाते.
बेलफळामध्ये थंडावा असतो म्हणूनच त्याला उन्हाळी सुपरफ्रूट म्हणून ओळखले जाते. ते शरीराला थंडावा देते. बेलमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी६ असते, तसेच मुबलक प्रमाणात फायबर, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, टॅनिन, कॅरोटीन, थायामिन आणि बीटा-कॅरोटीन असते. चला तर जाणुन घेऊया बेलफळाचा मुरांबा कसा बानवायचा
बेलफळाचा मुरांबा बनवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बेलफळ. साधारण १ किलो बेलफळ खरेदी करू शकता. तुम्हाला पुरेसे पाणी आणि गोडव्यासाठी साखरेऐवजी १ किलो खडीसाखर देखील लागेल. चवीसाठी अर्धा चमचा वेलचीची पूड.
बेलफळाचा मुरांबा कसा बनवायचा?
- सर्वप्रथम, पिकलेले बेलफळ घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर कापडाने पुसून कोरडे करा.
- बेलफळाची साल खूप कठीण असते, म्हणून ती लाटण्याने किंवा कोणत्याही जड वस्तूने फोडा.
- चाकूच्या मदतीने ते सालीपासून पूर्णपणे वेगळे करा, म्हणजे त्याचे तुकडे करणे सोपे जाईल.
- तुमची इच्छा असल्यास, तुम्ही बेलफळाचे लहान तुकडे करू शकता किंवा त्याच्या गोल चकत्या करु शकता.
- आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.
- जेव्हा पाणी खळखळून उकळू लागेल तेव्हा बेलफळ वाफेवर वाफवून घ्या.
- 8 ते 10 मिनिटांत बेल शिजून तयार होतील, त्यानंतर गॅस बंद करा. हे बेल स्टीमरमधून बाहेर काढून एका भांड्यात ठेवा.
- बेलफळ घातलेल्या भांड्यात खडीसाखर घाला. लक्षात ठेवा, प्रत्येक 1 किलो खडीसाखरेसाठी 1 लिटर पाणी घाला.
- आता तुम्हाला ते घट्ट पाक तयार होईपर्यंत उकळवून घ्या. ज्यासाठी किमान अर्धा तास लागू शकतो.
- तयार केलेल्या पाकात वेलची पूड घाला आणि नंतर गॅस बंद करा.
- अशा प्रकारे तयार केलेला बेलफळाचा मुरांबा शरीरासाठी फायदेशीर असतो. हा बेलफळाचा मुरांबा हवाबंद काचेच्या डब्यात साठवून ठेवा.

























































