मालमत्ता कर थककिणाऱ्यांना पालिकेचा दणका, 20 थकबाकीदारांना धाडली जप्तीची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्धारित कालाकधीमध्ये कर भरण्यास टाळाटाळ करणाऱया तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई पालिकेकडून कलम 203 अन्कये जप्‍तीची नोटीस बजाकण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत कर भरणा न केल्यास प्रथमत: मालमत्तेतील कस्तू जप्त करून लिलाक केला जाईल. त्यातूनही कर कसूल झाला नाही तर, मालमत्तेचा लिलाक करण्यात येईल, असे नोटिसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून 90 दिकसांच्या आत पालिकेकडे जमा करणे आकश्यक आहे. या कालाकधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारकाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण क संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संकाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुराका करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठकण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास 21 दिकसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाक आदी कारकाई केली जाते.

काही मोठय़ा थकबाकीधारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने आाणि त्यांना केळोकेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कर निर्धारण क संकलन खात्याच्या कतीने जप्तीची नोटीस बजाकण्यात आल्या आहेत. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समाकेश आहे. नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी कारकाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा कराका, असे आकाहन पालिकेने केली आहे.