
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सीझनसाठी हिंदुस्थानी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोरदार चढाओढ रंगली होती. पाटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतला हरयाणा स्टीलर्सने तब्बल १ कोटी ५१ लाखांची किंमत मोजून खरेदी केले आहे. त्याचबरोबर मोनू हा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. तेलगू टायटन्सने आपला स्टार खेळाडू राहुल चौधरीला कायम राखण्यासाठी तब्बल १ कोटी २९ लाख रुपये मोजले.
यापूर्वी लिलावात दीपक हुड्डा आणि नितीन तोमर यांच्यावर सर्वाधिक बोली लावण्यात आली. दीपक आणि नितीन यांना प्रत्येकी १.१५ कोटींना खरेदी केले.
Nitin Tomar equals the highest bid for the day, going for 1.15 Cr to @PuneriPaltan!
Keep watching the #VivoProKabaddiAuction – the action’s heating up!
— ProKabaddi (@ProKabaddi) May 30, 2018
जयपुर में होगा दीपक का निवास!
जयपुर पिंक पैंथर ने स्टार ऑलराउंडर दीपक निवास हुड्डा को सभी रिकॉर्ड तोड़ेते हुए 1.15 करोड़ रुपए में खरीदा।#VivoProKabaddiAuction pic.twitter.com/iKMSAJuNci
— ProKabaddi (@ProKabaddi) May 30, 2018
दीपक हुड्डाला जयपूर पिंक पँथर्सने आपल्या संघात सामील केलं आहे. तर नितीन तोमरला पुणेरी पलटनने खरेदी केलं आहे. गेल्या वर्षी नितीन तोमरला यूपी योद्धाने ९३ लाखांना खरेदी केलं होतं. याशिवाय यू मुंबाने यावर्षी इरानच्या फजल अत्राचलीला १ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. मुंबईत पार पडत असलेल्या या लिलावात ४२२ खेळाडूंवर बोली लागणार आहे, यामध्ये ५८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. लिलावात सहभाग घेणाऱ्या १२ संघाकडे एकूण ४ कोटींचं बजेट आहे.


























































