
नागरिकत्व दुरुस्तीला विरोधात जामिया मिलिया विद्यापीठात हिंसाचार उसळला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. आरोपींपैकी एकही विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जामिया आणि न्यु फ्रेंड्स कॉलनीतून 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी तीन आरोपींवर आधीही गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी कारवाई करून या 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
ज्या भागात हिंसाचार झाला आहे, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्या फुटेजमधून आरोपींची ओळख पटवली. तसेच जामिया हिंसाचार कारवाईत गोळीबार करण्यात आला नाही असे स्पष्टीकरण गृहखात्याने दिले आहे. रविवारी नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत निदर्शने करण्यात आली होती. तेव्हा उपस्थित जमावाने चार बस जाळल्या होत्या.



























































