लखनौमध्ये भिंत कोसळून दहा जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरातील दिलकुश भागात एक भिंत कोसळून दहा जण ठार झाले आहेत. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.0

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमी व्यक्तीचे मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.