बीडच्या जिल्हा रूग्णालयातील 10 जण कोरोनामुक्त

405

मुंबईहून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयामध्ये 10 दिवस उपचार करण्यात आले. त्यांना शनिवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात येत आहे. या 10 जणांमध्ये पाटोदा तालुक्यातील माय-लेकीसह केज आणि बीडचे 5, ईटकूर येथील एका महिलेचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातून कोरोनामुक्त झालेल्याची संख्या 15 वर गेली आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 62 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर 5 जण कोरोनामुक्त झाले होते. 6 कोरोनाबाधितांना उपचारासाठी पुण्याला पाठवले होते. बीड जिल्ह्यातील विविध रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी पाटोदा तालुक्यातील वहाली येथील माय-लेकी, बीड शहरातील 5 जण, ईटकूर येथील एक महिला व केज तालुक्यातील चंदनसावरगाव व केळगाव येथील दोघेजण रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना शनिवारी रात्री रूग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे. आता 40 कोरानाबाधितांवर उपचार सुरू आहेत. धारूर आणि पिंपळा येथील रूग्ण वळगले तर सर्व कोरोनाबाधित मुंबईहून आलेले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी कोरोना आजारात मोठी मेहनत घेऊन काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या