लवकरच राज्यभरात ‘दहा रुपयात थाळी’, मुख्यमंत्र्याची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘दहा रुपयांत थाळी’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार लवकरच राज्यभरात दहा रुपयात थाळी देणारी 50 केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्या केंद्रांचा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात दहा रुपयात थाळी देणारी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयांत थाळी देण्याचे वचन शिवसेनेच्या जाहीरनाम्यातून दिले होते. गोरगरीब, सर्वसामान्यांना माफक दरात दर्जेदार अन्न मिळावे म्हणून ‘दहा रुपयांत थाळी’ ही संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली. या उपक्रमाची सुरुवात शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरूही झाली आहे. मुंबईतील महपालिकेतही ही थाळी सुरू करण्यात आली आहे.