10 सवयी बदला, वजन झटपट कमी करा

4123
belly-fat-12

मेन-विल-मेन अशा टॅग लाईनसह एक जाहिरात टीव्ही वाहिन्यांवर चांगलीच गाजली होती. ज्यामध्ये पुरुष आपलं वाढलेलं पोट महिलेला दिसू नये म्हणून काही काळ पोट आत रोखून धरतात. या जाहिरातीमधील गंमतीचा भाग सोडला तर आज पुरुषच काय पण प्रत्येक जण आपल्या वाढलेल्या पोटाने चिंतीत आहे. पोट कमी करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते.

वजन वाढल्याने त्याचे विपरित परिणाम केवळ शरीरावर न होता मानसिक आरोग्यावर देखील होतो. लठ्ठ होण्याची कारणे अनेक आहेत जास्त खाणे, अनुवांशिकता अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे विविध आजार देखील जडतात. तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर पुढे अगदी साधेसरळ असे 10 उपाय दिले आहेत. दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलल्या तर यावर आपण विजय मिळवू शकतो.

1 ) प्रोसेस्ड फुड न खाता संपूर्ण आहार खाणे

प्रोसेस्ड फुड हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. नाश्त्यामध्ये संपूर्ण धान्याचा वापर करावा. संपूर्ण धान्यामध्ये सगळ्या प्रकारच्या न्युट्रिशनचा सामावेश होतो. बाजरी, नाचणी, मका आणि ज्वारी यांचा आपल्या नाश्त्यामध्ये सामावेश करा. पांढऱ्या, सफेद रंगाच्या भातापेक्षा ब्राउन राइसचा वापर करावा. नाश्त्यामध्ये ओट्स खाणे निरोगी व चविष्ट ठरते.

2) आहारात जास्त प्रोटीनचा सांमावेश

आहारात डाळींचा सामावेश जास्त करावा. राजमा, चण्याची डाळ, सोया अशा डाळींचा समावेश करावा. मोड आलेल्या कडधान्याचा आहारात समावेश करा. मटनाची खरेदी करताना ते कमी फॅटचे आहे याची खात्री करून घ्यावी. शरीरासाठी प्रोटीन खूप आवश्यक आहे, त्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात प्रोटिनचा सामावेश मोठ्या प्रमाणात करावा.

3) 3 भाज्या व 2 फळांचा रोज आहारात समावेश करावा

प्रयत्न करा की तुमच्या आहारात रोज 2 भाज्या व 2 फळांचा समावेश असणे आवश्यक. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन, मिनिरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स सोबत फायबर सुद्धा मिळते. आपल्या शरीराला प्रत्येक दिवशी 25 ते 30 ग्राम फायबरची आवश्यकता असते.

4) वजन वाढवणार्या गोष्टींचे सेवन टाळणे

मटन, लोणी, तूप, चीज आणि मलाई यांमुळे वजन झपाट्याने वाढते. लो फॅट किंवा डबल टोन्ड दुधाचा वापर करा. एकाच तेलाच्या वापराने शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करता येत नाही म्हणून आहारात विविध तेलांचा वापर करावा.

5) फास्ट फूड पासून लांब रहा

स्नॅक्स, फास्ट फूड आणि तळलेले पदार्ख यांमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त आहे. आपल्या आरोग्यासाठी हे पदार्थ चांगले आहे की नाही हे खरेदी करताना तपासून पहावे.

6) साखरेचा कमी वापर करणे

आपल्या एकूण कॅलिरी पेक्षा 10 % कमीच साखरेचा वापर करावा. वजन नियंत्रणासाठी एका दिवसात जास्तीत जास्त 10 ते 11 चमचे साखर पुरेशी आहे. यापेक्षा कमी प्रमाणही शरीरास उत्तम आहे. काही पदार्खांमध्ये नैसर्गिकदृष्ट्या गोडवा असतो.

7) दुपारचे जेवण न टाळणे

वजन कमी करण्यासाठी अनेकदा लोक उपाशी राहतात. मात्र असे करणे आरोग्यासाठी अधिक घातक आहे. दिवसभरात 3 वेळा योग्य डाएट करावा. आपल्या आहारात वेगवेगळ्या भाज्या, धान्य, प्रोटिन, दूध आणि दही यांचा सामावेश करावा.

8) नाश्त्यामध्ये फळांचे सेवन

दररोज सकाळच्या नाश्यत्यामध्ये फळांचा वापर करावा. कुटुंबातील व्यक्तींना जास्तीत जास्त फळे खाण्यास सांगणे. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहतात.

9) ताजे रस पिणे

सर्वप्रथम बाजारातून आणलेल्या रसांचा वापर करणे टाळा. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ आणि ज्यूस यांचा वापर शक्यतो टाळा. बाहेरून आणलेल्या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे वजन वाढण्यास ते कारणीभूत ठरते. जलजीरा आणि ताक प्यावे त्यामुळे तुम्ही नेहमी स्वस्थ व फीट रहाल.

10) टीव्ही बघत जेवू नये

टीव्ही बघता बघता जेवल्यास आपले लक्ष खाण्याकडे न राहता कार्यक्रमांकडे राहते आणि आपण किती खातो ते आपल्या लक्षात येत नाही. टीव्ही बघत जेवणारे लोक ओवरईटींगचे शिकार होतात आणि हळूहळू तुमचे वजन वाढते.

आपली प्रतिक्रिया द्या