मुक्त पत्रकारांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन द्या!

राज्यातील मुक्त, ई-पेपर आणि वेब पोर्टलवर कार्यरत पत्रकारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असून सरकारने त्यांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी जोरदार मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केली.

अनेक अनुभवी, सुशिक्षित पत्रकार सध्या स्वतंत्र स्वरूपात काम करत आहेत. त्यांना ना नियमित नोकऱया मिळतात ना कंत्राटी संधी. त्यामुळे अनेकांना वेब पोर्टलसाठी लेखन करून अत्यल्प मानधनावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे सरकार जसे सुशिक्षित बेरोजगारांना 4 हजार भत्ता देते त्याच धर्तीवर मुक्त पत्रकारांना 10 हजारांची पेन्शन द्या, अशी मागणी देसाई यांनी केली.