कौतुकास्पद! दहा वर्षाच्या मुलाने तयार केला मोबाईल गेम

569

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी स्वतःची कंपनी स्थापन करून या कंपनीमार्फत लहान मुलांबरोबरच सर्वांच्या मनोरंजनासाठी गेम्स तयार करून या गेमचे गोकुळाष्टमी मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. आर्यन सुरेश कुटे असे त्या मुलाचे नाव असून त्याने त्याचे आई वडिल सुरेश कुटे व अर्चना कुटे यांच्या मदतीने हा गेम डेव्हलप केला आहे.

उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यनने ओएओ इंडिया ही कंपनी स्थापन केली. डिजिटल मार्केटिंग डिझाइनिंग वेब डेव्हलपमेंट यासह मनोरंजनासाठी वेगवेगळे गेम्स या कंपनीमार्फत तयार केले जातात. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर आर्यन कुटे याने अत्यंत कमी वेळेत कृष्णा माखन मस्ती हा गेम लॉन्च केला आहे. लहान मुलांपासून कोणालाही हा गेम अत्यंत सोप्या पद्धतीने खेळता येणार आहे. ओएओ कंपनीच्या वतीने आणि आर्यन कुटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या गेमला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हा गेम
https://play.google.com/store/apps/details?id=com.oaoinfoindia.krishnamak hanmasti येथे जाऊन डाउनलोड करता येऊ शकेल

आपली प्रतिक्रिया द्या