100 ॲथलीट्सनी प्रोपेडलेरझ ड्युआथलॉन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 प्रोपेडेलर्ज क्लब ऑफ मडगावतर्फे 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या “व्होराड 5:55” डुआथलॉन हा कार्यक्रम 100 ॲथलीट्सनी यशस्वीरित्या पूर्ण केला.

प्रोपेडलेर्झ क्लबने बुधवारी प्रथमच झालेल्या या उपक्रमात पुरुष आणि स्त्रियांनी पहिल्यांदाच दक्षिण गोव्यातील वेल्साओ आणि कॅव्हेलोसीमदरम्यान 55 कि.मी. अंतरामध्ये सायकल चालवली आणि नंतर उतोर्डा बीचवर 2.5 कि.मी. आणि 5 कि.मी धावले.

फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात ५५ कि.मी. अंतराचे सायकलिंग तसेच २.५ कि.मी. धावण्याची स्पर्धा २ तास आणि २ मिनिटांत पूर्ण करण्यात आली, तर ५५ कि.मी. सायकलिंग आणि ५ किमी धावण्याचे प्रदीर्घ अंतर दोन तास १६ मिनिटांत पूर्ण केले.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व अंतरावर मास्क, सॅनिटायझर अशी कोविडरक्षक साधने कार्यक्रमस्थळी ठेवली होती.  उपस्थितांच्या योग्य सुरक्षेमुळे रस्ता सुरक्षादेखील सुनियोजित झाली. प्रोपेडेलर्ज क्लबकडून मडगाव शहरात गेल्या सहा वर्षांपासून आपल्या सदस्यांसाठी नियमित सायकल फेरीचे आयोजन होत असते.