
उत्तरप्रदेशमध्ये एका पोल्ट्री फार्मला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात 10 हजार कोंबड्या होरपळून मृत्यू पावल्या. या घटनेत पोल्ट्री मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
उत्तरप्रदेशच्या आंबेडकरनगरमधील अशरफाबाद गावात एका पोल्ट्री फार्मला शुक्रवारी पहाटे आग लागली. या आगीत 10 हजार कोंबड्या होरपळून मृत्यू पावल्या. आग लागल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळाजवळ पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे पोल्ट्री मालकाचे 65 लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच या आगीमुळे कोणतीही मनुष्य जिवीतहानी झाली नसल्याची माहिती अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली.
मुख्य पशु चिकित्सा अधिकारी डॉक्टर सुबोध कुमार हे आगीदरम्यान काही वाचवलेल्या कोंबड्यावर उपचार करत आहे. त्यातील काही कोंबड्या आगीमुळे गंभीर भाजल्या गेल्या आहेत. या आगीमुळे राजेश सिंग यांच्या 50 लाखांच्या कोंबड्या आणि 10 लाखांचा पोल्ट्री फार्म जळून खाक झाला. तसेच पोल्ट्री फार्ममधील 4 ते 5 लाखांचे उपकरणही जळाले. राजेश सिंग यांचे एकूण 65 लाखांचे नुकसान झाले आहे.




























































