
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांनी शंभरी पार केली आहे. आज एकूण 16 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 108 वर पोहचली आहे.
मिरज येथून आज एकूण 82 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 66 अहवाल निगेटिव्ह आले असून 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालात रत्नागिरी संगमेश्वरचे 6 तर गुहागर 4 पॉझिटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व व्यक्ती विलगीकरणात मध्ये होत्या.
संगमेश्वर तालुक्यात सापडलेले रूग्णांपैकी धामापूरातील दोन रुग्ण,कोळंबेतील दोन रूग्ण, भिर्कोंड येथील एक रुग्ण, कसबायेथील एक रूग्ण आहे. गुहागर तालुक्यात शृंगारतळी येथील चार रूग्ण आहेत. रत्नागिरी तालुक्यात नर्सिंग होस्टेलमधील चार रूग्ण,कर्ला येथील एक आणि धामणसे येथील एका रूग्णाचा समावेश आहे.



























































