सांताक्ल़ॉजकडून 10 वर्षीय मुलीला हवे ‘एवढे’ गिफ्ट, यादी ऐकून चक्रावाल

924

‘नाताळ’ अर्थात ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा मोठा सण. हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंही या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात. ख्रिसमसला सांताक्लॉज येऊन आपली हवी ती इच्छा पूर्ण करतो अशी लहानांची धारणा असते. त्यामुळे लहान मुलांना याचे विशेष आकर्षण असते.

नाताळच्या दिवशी जगभरातील हजारो मुले सांताक्लॉजला पत्र पाठवतात. नाताळाच्या रात्री बर्फावरुन घसरत, हातातील घंटा वाजवत आपल्या हरणांच्या गाडीवरुन मुलांना शुभेच्छा व भेटवस्तू देण्यासाठी सांताक्लॉज येतो असे चिमुरड्यांना वाटते. लहान मुलांच्या कथा, गाणी यामधून हे काल्मनिक पात्र अधिकच लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळे लहान मुलं या सुंदर दिवसाची वाट आतुरतेने पाहतात.

‘सीक्रेट सेंटा’मध्ये सांताक्लॉजने आपली आवडीची वस्तू द्यावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण एका 10 वर्षाच्या मुलीने तर कहरच केला असून तिच्या ‘ख्रिसमस गिफ्ट’ची यादी पाहून तुम्हीही चकीत व्हाल. ‘आयफोन-11’, ‘न्यू मॅकबूक’, ‘अ रिअल बनी’ (ससा), ‘मेकअप’, ‘पिंक डक टॉप’, ‘न्यू शूज’ आणि ‘चार हजार डॉलर’ यासह तिने अनेक गोष्टींचा आपल्या यादीत समावेश केला आहे. तिला हव्या असलेल्या भेटवस्तूंची यादी तिच्या वडिलांनी ट्वविटरवर शेअर केली आहे. 10 वर्षीय मुलीही ही यादी पाहून ते स्वत: हतबुद्ध झाले आहेत.

वाचा काय आहे 10 वर्षीय चिमुरडीची ख्रिलमस लिस्ट –

आपली प्रतिक्रिया द्या