‘नरकाच्या धबधब्यात’ पडलेल्या पिल्लाला वाचवताना 11 हत्तींचा मृत्यू

1485

हत्तींचा देश अशा ओळख असलेल्या थायलंडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. येथे धबधब्यात पडलेल्या पिल्लाला वाचवताना 11 हत्तींचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मृत हत्तींचा आकडा 6 होता, मात्र आता हा आकडा वाढून 11 झाला आहे. मध्य थायलंडच्या खाओ याई नॅशनल पार्कच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण थायलंडमधल्या खाओ याई राष्ट्रीय अभयारण्यात 3 वर्षांचं हत्तीचे एक पिल्लू पाय घसरून धबधब्यात पडले. त्याला वाचवताना या हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. खाओ याई नॅशनल पार्कच्या स्थानिक अधिकाऱ्यांनुसार गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेत सुरुवातीला फक्त 6 हत्ती मृत झाल्याचे दिसले होते. मात्र ड्रोनच्या माध्यमातून अजून पाच हत्तींच्या मृतदेहांचा शोध लागला आहे. ज्या ठिकाणी या हत्तींचा जीव गेला त्याला जागेला स्थानिक भाषेत ‘नरकाचा धबधबा’ असेही म्हणतात.

thailand1

हाईव नॅरॉक (नरकाचा धबधबा) असे या धबधब्याचे नाव आहे. नावावरूनच या धबधबा किती धोकादायक असेल, याची कल्पना येते. याठिकाणी यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. 1992 सालीसुद्धा 8 हत्तींचा एक कळप या धबधब्यात पडून सर्वच्या सर्व हत्तींचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या