
सामना ऑनलाईन । सांगली
सांगलीतील ब्रह्मनाळ येथे पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेली बोट उलटली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप सात जण बेपत्ता असल्याचे समजते. दुर्घटनाग्रस्त बोट ही खासगी असून गावकरी स्वत: त्या बोटीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. पलूस तालुक्यातील भिलवडीजवळील गावात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ब्रह्मनाळ येथे झाले बोट दुर्घटनेमध्ये मयतांची समजलेलीत नावे
1) मयत एक लहान मूल
2) कल्पना रवींद्र कारंडे
3) कस्तुरी बाळासो वडेर
4) पप्पू ताई भाऊसो पाटील
5) लक्ष्मी जयपाल वडेर
6) राजमाती जयपाल चौगुले
7) बाबासो अण्णासो पाटील
8) अनोळखी इसम
या दुर्घटनेमध्ये पिल्लू तानाजी गडदे नावाची व्यक्ती अजूनही सापडलेली नाहीये.
Deepak Mhaisekar, Divisional Comissioner of Pune Division: A boat overturned near Bhamnal in Palus block of Sangli district. There were 27-30 villagers on that boat. So far, 9 bodies have been recovered, and 16 people have been rescued. Rest still missing. pic.twitter.com/Ty26a1zrhu
— ANI (@ANI) August 8, 2019
Milind Bharambe, Special Inspector General (Law & Order), Maharashtra Police: It was a rescue boat of locals who were trying to take people from flooded area to safer place. 9 bodies taken out till now. 10-12 are feared dead. Search for rest is on. Search & rescue operation on. https://t.co/Izao8SopIc
— ANI (@ANI) August 8, 2019
बचाव कार्यातील या खासगी बोटीतून 30 ते 35 जणांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत होते. मात्र त्याच वेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट उलटली असल्याचे समजते. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी कल्पना कारंडे, कस्तुरी वडेर, बाबासो पाटील, पप्पुताई पाटील, राजमाती चौगुले या चौघांची ओळख पटली आहे.

























































