ऑस्कर पुरस्कारासाठी जोकरला सर्वाधिक नामांकनं

623

जगभरातील चित्रपटप्रेमींचे लक्ष असणाऱ्या 92 व्या अॅकॅडमी अवॉर्डस् अर्थात हॉलीवूडच्या ‘ऑस्कर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्कार सोहळ्यात ‘जोकर’ या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत, तर “हिंदुस्थानकडून पाठविलेला झोया अख्तर यांचा ‘गलीबॉय’ स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द लास्ट कलरकडून अजूनही आशा आहेत. 10 फेब्रुवारी रोजी (हिंदुस्थानी वेळेप्रमाणे) हा पुरस्कार सोहळ्या रंगणार आहे. या वर्षी क्विंटन टाँटनोचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड’ आणि टोड फिलिप्सचा जोकर ऑस्करच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत. अशा सात विभागांमधील नामांकनांमध्ये जोकरने बाजी मारली आहे.

वॉर्नर ब्रदर्स या निर्मिती संस्थेच्या जोकर चित्रपटाला तब्बल 11 नामांकने मिळाली आहेत. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत या नामांकनाचा समावेश आहे. वर्ल्ड वॉर ओने आणि वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड या चित्रटांनाही प्रत्येकी 10 नामांकने मिळाली आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत जोकरचा जोकीन फिनिक्स, वन्स अपॉन इन हॉलिवूडसाठी लिओनार्दो डी काप्रियो तसेच मॅरेज स्टोरीसाठी ऍडम ड्रिवर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या