बंगळुरूत 110 मिमी पाऊस; गाडय़ा बुडाल्या, घरांत घुसले पाणी

शहरात रविवारी पावसाने अक्षरशः तांडव केले. तब्बल 110 मिमीहून अधिक पाऊस झाल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेली. गाडय़ा बुडाल्या आणि घरात पाणी घुसले. अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी न्यावे लागले. महादेवपुरा येथे भिंत कोसळून एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रात्रभर पाऊस झाल्यामुळे भिंतीचा पाया खचला होता, अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.