
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ६ व्या स्मृतीदिनानिमित्त युवासेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व सचिन भोयर यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथे नेत्रदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मालार्पन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ११० शिवसैनिकांनी केला नेत्रदानाचा संकल्प
युवासेना व जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या सहकार्याने नेत्रदान सदर संपन्न झाले. या शिबीरामध्ये ११० युवकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याकरीता आपली नोंदणी केली. ”मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे” तसेच युवासेना समाज भावनेतून हे कार्यक्रम घेत असल्याचे सागितले व भविष्यात देखील युवासेना चांगले सामाजिक कार्यक्रम राबवेल ह्याची हमी दिली. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अजय स्वामी, युवासेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, सचिन भोयर, डॉक्टर यांनी नेत्र शिबीराचे महत्व पटवून दिले. भविष्यात देखील अशा जनसामान्याच्या हितासाठी सामाजिक उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडु हजारे, आकाश साखरकर, प्रमोद पाटील, अविनाश पुट्टेवार, आशिष कावटवार, सोनू ठाकुर, सुरज घोंगे, देवकुमार विश्वकर्मा, प्रणय धोबे, प्रमोद नागोसे, हर्षल शिंदे, उमेश कूडले, महिला आघाडी मनस्वी गिऱ्हे, शैला पाटील, रूपल उराडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























































