झवेरी बाजारातील दुकानावर मराठी नामफलक नसल्याने नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दुकानांवर मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, झवेरी बाजारातील शेख मेमन स्ट्रीटवरील मे. नारनदास मनोरदास प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात या नियमाचे उल्लंघन झाल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळले. 12 नोव्हेंबर रोजी केलेल्या पाहणीत दुकानाच्या पाटीवर मराठी अक्षरे सुरुवातीला नसल्याचे आणि इतर भाषांतील अक्षरांच्या तुलनेत त्यांचा आकार लहान असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या दुकानात 18 कर्मचारी काम करत असल्याचीही नोंद आहे. या प्रकरणी महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.