नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेचे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगर जिल्ह्यामध्ये 66 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सर्वाधिक उमेदवार नेवासामध्ये 17, तर सर्वात कमी उमेदवार अकोले तालुक्यामध्ये आहेत. नगर जिल्ह्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजने यांनी कोपरगावमधून तर भाजपचे विजय वहाडणे यांनी या मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. सर्वाधिक उमेदवार नेवासामध्ये असल्याने या मतदारसंघांमध्ये दोन मशीन लावाव्या लागणार आहेत.

बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेणे करता सोमवारी प्रक्रिया पार पडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये अकोले 2, संगमनेर 3, शिर्डी 3 ,कोपरगाव 8, श्रीरामपुर 21 ,नेवासा 3, शेवगाव 7, राहुरी 5, पारनेर 3, नगर शहर 2 ,श्रीगोंदा 5, कर्जत-जामखेड 4 ,असे एकूण जिल्ह्यामध्ये 66 उमेदवारांनी माघार घेतली आहे. पारनेरमध्ये सुजित झावरे ,अजित चेडे, तसेच संदेश कार्ले यांनी पारनेरमधून अर्ज मागे घेतले. पाथर्डी मतदारसंघांमध्ये अपक्ष म्हणून भाजपाच्या हर्षदा काकडे व अमोल गर्जे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. श्रीरामपूर मधून खासदार लोखंडे यांचे सुपुत्र चेतन लोखंडे यांनी माघार घेतली. मात्र कोपरगाव मतदारसंघांमध्ये अपक्ष म्हणून विजय वहाडणे तसेच मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश मिळवणे राजेश परजणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, या निवडणुकीतून माघार घेतली नाही. नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव मतदारसंघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे.

उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसानंतर नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार नेवासे मतदारसंघांमध्ये तर सर्वाधिक कमी उमेदवार हे अकोले मतदारसंघांमध्ये आहेत. अकोल्यामध्ये 4, संगमनेर आठ, शिर्डी 5 ,कोपरगाव 14 ,श्रीरामपूर 11, नेवासा 17, शेवगाव 9, राहुरी 7, पारनेर 6, नगर शहर 12 ,श्रीगोंदा 11, कर्जत-जामखेड 12, असे एकूण 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, सोमवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करुन निवडणुकीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघांमध्ये सरळ लढत होणार आहेत तर उर्वरित ठिकाणी तिरंगी ते दुरंगी लढती होणार आहेत. नगर जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमध्ये बहुजन वंचित विकास आघाडीने उमेदवार उभे केलेले आहेत. तर नगर शहरामध्ये एमआयएमने उमेदवारी दिली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये भाजपाने पाच विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये कर्जत जामखेड मधून पालकमंत्री राम शिंदे ,शेवगाव म्हणून मोनिका राजळे ,राहुरी मधून शिवाजी कर्डिले, कोपरगाव मधून स्नेहलता कोल्हे ,नेवासा मधून बाळासाहेब मुरकुटे यांचा समावेश आहे. तर भाजप मध्ये आलेले मंत्री राधाकृष्ण विखे यांना शिर्डी मधून तर राष्ट्रवादी मधून आलेले आमदार वैभव पिचड यांना अकोलामधून तर  बबनराव पाचपुते यांना पुन्हा भाजपाने या जिल्ह्यांमध्ये संधी दिली आहे. शिवसेनेला नगर जिल्ह्यातील चार जागा मिळाल्या  असून नगर शहरातून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, पारनेर मधून विधानसभेचे उपसभापती विजय औटी, काँग्रेसमधून आलेले श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे तर संगमनेर मधून साहेबराव नवले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.